loader
Breaking News
Breaking News
Foto

महाधिवक्ता ॲड. मिलिंद साठेंचा लोटिस्माचा "अपरांतरत्न" पुरस्काराने सन्मान

खेर्डी चिपळूण (संतोष पिलके) : माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या पासून चिपळूण जवळ नाल जोडली असून चिपळूण ने अनेक गोष्टी शिकवल्या ते उत्साह वा मनोरंजनाचे असून येथील असणाऱ्या मित्र परिवार व येथील लोकांसोबत नाल जोडली असल्याने चिपळूणशी माझे ऋणानुबंध जुळले असल्याने माझ्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीत चिपळूण चा मोठा वाटा असल्याने चिपळूण वासियांकडून सन्मान स्वीकाराने हे खरंच गौरवास्पद व अभिमानाचे असल्याचे गौरवोदगार राज्य शासनाचे नवनियुक्त महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी काढले. त्यांची महाराष्ट्र राज्यशासनाचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केल्याने ऍड. मिलिंद साठे यांना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे अपरांतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा पुरस्कार सोहोळा दि. 27 रोजी शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बाबासाहेब परुळेकर व जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, ज्येष्ठ विधिज्ञ् बाबासाहेब परुळेकर, सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर, डॉ. यतीन जाधव, मंचावर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला संविधाना चे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाधिवक्ता साठे यांची बहीण संध्या साठे जोशी यांनी मिलिंद साठे यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत च्या त्यांच्या एकूण प्रवासाची अत्यंत समर्पक अशी मांडणी करतांना साठे हे लहानपणापासून च अभ्यासात हुशार होते ते त्यासोबच त्यांच्या बाळपणीच्या गमतीजमती देखील सांगितल्या. त्यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा शुभेच्छा संदेश ओक यांनी वाचून दाखविला. त्यानंतर साठे यांना देण्यात आलेलं आसावरी देशपांडे यांनी लिहिलेले मानपत्र मनीषा दामले यांनी वाचून दाखवले.

टाइम्स स्पेशल

महाधिवक्ता यांचे काम सरकारला सल्ला देणे हे काम असले तरी योग्य सल्ला देणे महत्वाचे ॲड. मिलिंद साठे सांगताच सभागृहात टाळ्या झाल्या.महाधिवक्ता साठे पुढे म्हणाले माझे पाहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण मालघर मधील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण रामपूर हायस्कुल मध्ये झाले. त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मालघर येथून एसटीने डीबीजे महाविद्यालयात जाणे येणे सुरु झाले त्यावेळी खऱ्या अर्थाने चिपळूण जवळ ऋणानुबंध जुळून येऊन लागले. वडिलांची कडक शिस्त व संस्कार यामुळे अभ्यासात प्रगती होत गेली. चिपळूण ही रात्नांची खाण आहे. त्यामुळे चिपळूण मध्ये जन्म घेणे हे भाग्याची बाब आहे. माझी महाधिवक्ता म्हणून निवड झाली आहे ते राज्यपाल नियुक्त संविधानिक पद घटनेच्या 167 व्या कलमानुसार आहे. त्याचे काम महाराष्ट्र सरकार व विधिमंडळाला योग्य सल्ला देणे. सरकारची हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील कामे करणे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg