loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री क्षेत्र टेरव येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न

चिपळूण - रूढी-परंपरेनुसार शतक पार करणार्‍या श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात घटस्थापना व विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताहाचा आनंद सोहळा नुकताच संपन्न झाला. वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार मंगलमय काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ व त्यानंतर नामांकित किर्तनकार ह. भ. प. सर्वश्री प्रमोद राणे, सतीश सकपाळ, सतीश सावंत, अरुण पिदनकर, नारायण पवार, संजय साळवी आणि अरुण जाधव महाराज यांच्या श्रवणीय कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. मृदुंग व भजनाची लयबद्ध साथ रोशन चव्हाण व धरकरी राम साळवी व पराग जाधव यांनी दिली. तसेच रात्रौ हरी जागर करण्यात आला. सतत सात दिवस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हरिनाम सप्ताहच्या या कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ-भाविकांनी आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सप्ताहाची सांगता ह.भ. प. श्री भागवत भारती महाराज आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. त्यानंतर हंडी फोडून काला करण्यात आला व घट हलवून विधीवत पूजा करून वीणा उतरविण्यात आली. ग्रामस्थ बंधू भगिनींनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा गजर करून परिसर मंगलमय केला. सप्ताह समाप्तीचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले. अखंड हरिनाम सप्ताहात जात-पात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता फक्त आणि फक्त भक्तिभाव जपला जातो आणि हाच भक्तीभाव प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जा देतो, त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे ही काळजी गरज आहे, असे मत मान्यवर कीर्तनकारांनी मांडले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg