loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय बक्षीस वितरण व जिल्हास्तरीय स्पर्धांचा गौरव समारंभ सरस्वती विद्यामंदिर पाचल येथे संपन्न

तुषार पाचलकर (राजापूर ) - राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे शालेय बक्षीस वितरण समारंभ तसेच दि.२३ व दि.२४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात, आनंदात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत पोतदार (कोल्हापूर) हे उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना "माता, माती आणि मातृभाषा" या तीन गोष्टी जतन करण्याचा मौलिक संदेश दिला. शाळेत मिळणारे संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात; त्यामुळे शालेय संस्कार आत्मसात करून आदर्श व जबाबदार नागरिक बना, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमधून चांगले वक्ते व चांगले लेखक तयार होतील असे मान्यवरांच्या मार्गदर्शनपर मनोगतातून व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी दि.२३ व दि. २४ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धामध्ये विविध गटांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्षात क्रीडा, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव व स्पर्धाप्रमुख किशोरभाई नारकर, संचालक सिद्धार्थ जाधव, लिंगायत, साळवी गुरुजी, विकास कोलते, अण्णा पाथरे उपस्थित होते. तसेच पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष बाबा सावंत, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष विनायक सक्रे, सामाजिक कार्यकर्ते विलास गांगण, केंद्रप्रमुख मासये, माजी मुख्याध्यापक सदानंद ताम्हणकर, बाबा सुतार, योगेश सुतार (उपसरपंच, कोळंब), विजय कदम (उपसरपंच, हरळ), संदीप बारस्कर, माजी मुख्याध्यापक देसाई, प्रकाश सावंत, राजाभाऊ सुतार, आबा आडीवरेकर (माजी जिल्हा परिषद सदस्य) व शशिकांत गांगण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा गुरखे यांनी प्रास्ताविक केले. तर पर्यवेक्षिका गांधी यांनी मान्यवरांचे आभार मानले. या बक्षीस वितरण समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नवी ऊर्जा व प्रेरणा निर्माण झाली असून उपस्थित पालक व ग्रामस्थांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संस्थांचालक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले. स्पर्धा संपन्नतेसाठी ज्या सन्माननीय देणगीदारांनी आर्थिक सहकार्य केलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg