loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध

पनवेल (जितेंद्र गावडे) - पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपाचे कमळ फुलले प्रभाग क्र. १८ (ब) मधून भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे भाजपामध्ये नवचैतन्य पसरले असून फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवीत आनंद व्यक्त केला. प्रभाग क्र. १८ (ब) मध्ये केवळ दोनच अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज छाननीत शेकापचे राहुल गावंड यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरवल्याने नितीन पाटील यांचा विजय सुकर झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नितीन पाटील यांच्या बिनविरोध निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूरध्वनीवरून नितीन पाटील यांचे अभिनंदन केले. पनवेल महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवणुकीत नितीन पाटील यांच्या रूपाने भाजपाचे कमळ फुलल्यानंतर ’टीळा लागला, आता मळाही आम्हीच फुलवणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg