loader
Breaking News
Breaking News
Foto

मोदी सरकार काम करो, बांगलादेशी जिहादीयो को ठोक दो, हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या आंदोलनात संतप्त मागणी

चिपळूण (ओंकार रेळेकर) - बांगलादेशात मोहम्मद युनूस सरकार, पोलिस आणि तेथील जिहादी संघटना मिळून सुनियोजितपणे हिंदूंचा नरसंहार करण्याचे हे षड्यंत्र रचलेले आहे. केवळ हिंदूंच्या हत्या नव्हे, तर हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात येत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात येत आहे. बांगलादेशातील मयमनसिंह भागात सनातन धर्म मानणाऱ्या तरुण हिंदू दीपू चंद्र दास या निरपराध हिंदू युवकाची जमावाकडून अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचे शव पोलिसांच्या देखत झाडाला टांगून जाळण्यात आले, अशा घटना तेथील हिंदू समाजात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेने भारतात प्रचंड संतापाची लाट उसळली असून चिपळूण येथे ही हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि धर्माभिमानी हिंदूं बांधवांच्या उपस्थितीत मोदी सरकार एक काम करो, बांगलादेश के जिहादीयो को ठोक दो... तसेच बांगलादेशी युनूस सरकार मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. शनिवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी वेस मारुती मंदिर समोर हे आंदोलन घेण्यात आले. १९७१ च्या युद्धात ३ सहस्त्र पेक्षा अधिक भारतीय जवानांनी बलिदान देऊन आजच्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. तेथे आज हिंदूंचा नरसंहार होणार असेल तर भारतातील हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मोदी सरकारने पुन्हा बांगलादेशात सैनिकी कारवाई करावी आणि तेथील हिंदूंना सुरक्षित क्षेत्र निर्माण करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सह संयोजक प्रशांत उतेकर, वि ही प चे जिल्हा मंत्री उदय चितळे, शिवसेनेचे नगरसेवक निहार कोवळे, भाजपचे नगरसेवक संदीप भिसे, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके यांनी आपले विचार मांडले. हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संघटक सचिन सकपाळ यांनी आंदोलनाचे सूत्रसंचालन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg