loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर विभागीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश

मालवण (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षा खालील कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने तर मुलांचा संघ उपविजयी ठरला असून या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मुलींच्या संघाची निवड दिनांक २ आणि ३ जानेवारी २०२६ रोजी वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेसाठी झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओरोस येथे क्रीडा संकुलमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील कोल्हापूर विभागीय शालेय लंगडी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विजयी संघ सहभागी झाले होते. या सर्व संघांवर मात करत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मुलींच्या संघाने सातारा संघाला हरवत विजय प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना प्रशाळेचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर, क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर, भूषण गावडे यांचे मार्गदर्शन लाभले, या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसुळ यानी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे व सर्व शिक्षक शिक्षिका , कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर तसेच संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg