loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे येथे जुन्या भांडणाचा राग ठेवून मारहाण; दोघे जखमी

खेड : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोघांना दगडफेक करुन मारहाण केल्याची घटना भरणे (ता. खेड) येथील पाटणे कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी (२६ डिसेंबर) रात्री घडली. या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी नारायण भोसले (वय २६, रा. भरणे, खेड) व त्याचा मामा संतोष तात्या वाडकर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या मारहाणीबाबत सनी भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ते व त्यांचा भाऊ ऋषभबाबुराव भोसले हे दुचाकीने (एमएच ०८, एएस ७७९२) भरणेकडे येत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी पाटणे कॉम्प्लेक्सजवळ उभे असलेले संशयित अनिकेत साळुंखे व अजिंक्य साळुंखे (दोघेही रा. मंगळवार बाजारपेठ, भरणे, खेड) यांनी २४ डिसेंबर रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून अनिकेत याने सनीच्या डोक्यावर दगड मारला. हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या संतोष वाडकर यांना अजिंक्यने दगडाने मारले. तसेच दोघांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खेड पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२) (३), ३५२, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg