loader
Breaking News
Breaking News
Foto

दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील पहिले ‘कोकण विभागीय विद्रोही कवी साहित्य संमेलन

खेड, जि. रत्नागिरी : कोकणात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण विभागीय विद्रोही कवी साहित्य संमेलन २०२६च्या नियोजनासाठी आयोजित बैठक दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी खेड येथे यशस्वीपणे संपन्न झाली. ही बैठक कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन, खेड (रजि.) यांच्या वतीने घेण्यात आली. कै. भाऊसाहेब पाटणे संकूल, नगरपरिषद वाचनालयाच्या शेजारी झालेल्या या बैठकीस विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघटक किशोर ढमाले (पुणे), राज्य उपाध्यक्ष प्रा.विलास बुवा (पुणे), राज्य सदस्य ॲड.सुदिप कांबळे (सिंधुदुर्ग), राज्य सदस्य मा. अशोक मोरे (खालापूर रायगड), प्राध्यापक वामन वळवी (गडचिरोली), डॉ. आप्पाराव चव्हाण (नंदुरबार),यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीदरम्यान संमेलनाचे स्वरूप, उद्दिष्टे, आयोजनाची रूपरेषा, विविध समित्यांची रचना तसेच कोकणातील साहित्यिक, कवी व सामाजिक कार्यकर्त्यांचा व्यापक सहभाग कसा वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. माता रमाई जयंती निमित्त वणंद ता.दापोली येथुन मशाल मिरवणूक व रायगड वरून आणि क्रांतीभूमी चवदार तळ्यावरून मशाल मिरवणूक आणण्याचे ठरवण्यात आले. “साहित्य हे व्यवस्था परिवर्तनाचे सबळ साधन आहे” या विचाराला केंद्रस्थानी ठेवून हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील साहित्यिक, विद्रोही कवी , साहित्यीक, चित्रकार ,कलावंत,विचारवंतांनी संमेलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या बैठकीस कोकणातील विविध भागातून साहित्यप्रेमी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे आयोजन कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन, खेड (रजि.) चे संस्थापक अध्यक्ष अनिल पांडुरंग येसोंडे (पत्रकार तथा संपादक) व सचिव सचिन मोहिते यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg