loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रा.डॉ.आनंद आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी: गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी येथे प्राध्यापक व बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे विभाग प्रमुख म्हणून काम करणारे.डॉ.आनंद आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनेलचे संस्थापक श्री. मुजमुद्दीन काझी यांच्या सहकार्यातून ठाणे येथे पत्रकार म्हणून कार्यरत असणारे सुहास खंडागळे . श्री उदय गोताड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण विकासासाठी पहिला कुणबी महोत्सव आयोजित केला होता त्यानिमित्ताने डॉ.आनंद आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ आनंद आंबेकर गेली 26 वर्ष महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत समाजशास्त्र विषयांमध्ये एम ए ,एम फिल आणि पीएचडी केल्यानंतर काउन्सलिंग संदर्भात विशेष डिप्लोमा केला आहे त्यामधून अनेक विद्यार्थी आणि इतर व्यवसायिकांना मार्गदर्शन करत असतात.त्याचबरोबर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी कलाक्षेत्रातील व्यावसायिक जीवनात यशस्वी आहेत नवीन एज्युकेशन पॉलिसी नंतर इंटरप्रिनरशिप मॅनेजमेंट हा विषय शिकवत असताना व्यावसायिक नियोजन संदर्भात मार्गदर्शन करत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून गेली 18 वर्ष कार्यरत आहेत मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास मॅनेजमेंट समिती मध्ये काम करतात. काही वर्ष बोर्ड ऑफ स्टुडन्टz डेव्हलपमेंट या कुलगुरूंना सहकार्य करणाऱ्या समितीमध्ये कार्यरत होते त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना विद्यापीठ स्तरावर राबवल्या पाहिजेत याबद्दल त्यांनी विद्यापीठ स्तरावर काम केले आहे.

टाइम्स स्पेशल

कला क्षेत्रामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरी याचे आजीव सभासद आणि कार्यकारणी सदस्य म्हणून काम करतात त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेत आजीव सभासद आणि कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत ,पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी काही वर्ष कोकण समन्वयक म्हणून महाराष्ट्रीयन कला उपासक पुणे यांच्यासोबत काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना श्री संवाद प्रतिष्ठान तर्फे अनेक उपक्रम राबवत असतात.महाराजा फाउंडेशन तर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये गेली 20 वर्ष मॅनेजमेंट करंडक देऊन विद्यार्थ्यांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट चे कौशल्य विकसित व्हावे म्हणून सातत्याने काम करत आहेत. जय जीवदानी एक फॅमिली ग्रुप स्थापन करून गेली दहा वर्ष दर सहा महिन्याने चिंतन शिबिर घेऊन परिवारातील 40 सदस्यांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक सहकार्य देण्यासाठी विशेष फॅमिली संघटनेचे मॉडेल तयार केले आहे. रत्नागिरी भूषण पुरस्कारावेळी डॉ. आनंद आंबेकर यांची पत्नी गौरी आंबेकर महाराजा परिवाराचे मित्र एडवोकेट सुजित कीर ,सौ. शितल कीर ,श्री. राजेश जाधव ,सौ. स्वाती जाधव श्री. सचिन सावंत ,सौ.सुरभी सावंत ,श्री संदेश कीर सौ. हेमाली किर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg