loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा प्रशालेचे ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत यश

खेड - पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली व आत्माराम सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. शारदा आत्माराम यादव यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा व जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये श्री समर्थ विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या गोळा फेक, लांब उडी, धावणे, रिले या स्पर्धांमध्ये अंश यादव, मुस्तफा सुर्वे, माही जाधव, धनश्री पिंपळकर, द्रोण फागे, सुजल चव्हाण, आरुष जाधव या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री.उदय शेटवे, खजिनदार श्री.दिग्विजय इंदुलकर,प्राचार्य डॉ.एस.एस.अली, क्रिडा शिक्षक श्री.दादासाहेब ब्राम्हणे, कु.रसिका सूर्यकांत पालांडे, कु.सिद्धी बाळकृष्ण पांचाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg