loader
Breaking News
Breaking News
Foto

२०२६चे स्वागत करणारा स्वरूपानंदच्या ठेव वृद्धी मासाचा प्रारंभ आकर्षक ठेव योजनांसह ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्यासाठी आतुर – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ होत असून सन २०२६ सालचे स्वागत करतांनाच स्वरूपानंद ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याचे समीप आहे. दि.३१ डिसेंबर २०२५ अखेर ३९४ कोटींच्या ठेवी संकलित असून नव्या वर्षाच्या प्रारंभीच ४०० कोटींचा ठेव टप्पा स्वरूपानंद पतसंस्था पूर्ण करेल असा विश्वास ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. स्वरूपानंदच्या १७ शाखा ठेवीदारांच्या स्वागतासाठी, नववर्षाच्या शुभकामना देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विविध ठेव योजना घेऊन ग्राहक, ठेवीदार, सभासद यांचेसाठी विश्वासार्ह, आकर्षक गुंतवणुकीच्या संधी घेऊन स्वरूपानंदने नववर्ष स्वागत ठेव योजना घोषित केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वरुपांजली ठेव योजना १६ ते १८ महिने सर्वसाधारण ८.००% व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.१०%, सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) सर्वसाधारण ८.१०% व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.२५% याप्रमाणे आकर्षक योजना देतांनाच महिला व ज्येष्ठ नागरिक यांना अधिकच्या व्याजदर योजना जाहीर केल्या आहेत. एक रक्कमी ५ लाख किंवा अधिक ठेवीसाठी ८.५०% व्याजदर घोषित केला आहे. नववर्षाचे स्वागत करतांना स्वरूपानंद ४०० कोटी ठेव संकलन पूर्ण करेल असा विश्वास ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. स्वरूपानंदचा समिश्र व्यवसाय रु.६७९ कोटी झाला असून संस्थेच्या स्वनिधीत वाढ होत स्वनिधी रु.५४ कोटी ३९ लाखापर्यंत पोहोचला असून भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण २८% झाले आहे. सी.डी.रेशो ६३.१९% झाला आहे. संस्थेच्या गुंतवणुका रु.१६९ कोटी ८६ लाख झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत ठेव योजनेत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg