loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक रोहन पाटील यांना मानाचा जिल्हास्तरीय 'ज्ञानदीप पुरस्कार' प्रदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सामाजिक भान राखून शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय (दाणोली) येथील शिक्षक रोहन गोविंद पाटील यांना यंदाचा मानाचा 'सिंधुदुर्ग जिल्हा ज्ञानदीप पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडी येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. मूळचे शिवणगे (ता. चंदगड) येथील रहिवासी असणारे रोहन पाटील गेली १८ वर्षे दाणोली हायस्कूलमध्ये सहायक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ गणित विषयापुरते मर्यादित न राहता, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोकून दिले आहे. सांस्कृतिक वारसा: लेझीम, गोफ नृत्य, साडी ड्रिल, मानवी मनोरे आणि मर्दानी खेळ यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना निपुण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली लेझीम पथके जिल्हाभरात प्रसिद्ध आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ पासून आतापर्यंत ९२ विद्यार्थ्यांनी किक बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, मार्शल आर्ट आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पदके पटकावली आहेत. चालू वर्षीही दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्पमित्र म्हणून कार्य: समाजसेवेचा भाग म्हणून परिसरातील सापांना पकडून, लोकांच्या मनातील भीती दूर करत त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात. ज्ञानदीप मंडळाच्या वतीने गेली १९ वर्षे हा उपक्रम राबविला जात असून, रेश्मा भाईडकर आणि व्ही. टी. देवण यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला होता. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक सर म्हणाले की, "ज्ञानदीप पुरस्कार ही एक प्रकारची दिलेली शाबासकी असून, या माध्यमातून समाजाचे ऋण फेडले जाते."

टाईम्स स्पेशल

या सोहळ्याला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, सी.ए. लक्ष्मण नाईक, अभिमन्यू लोंढे, सागर चव्हाण, जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस.आर. मांगले, कवी विठ्ठल कदम, दिपक गावकर, एस जी साळगावकर, आर्वी नारकर, एकनाथ घोंगडे, सुनील नेवगी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले, तर आभार विनायक गवस यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg