loader
Breaking News
Breaking News
Foto

घटिवळे येथील रेल्वे ट्रॅकजवळ अनोळखी तरुणाचा मृत्यू

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे ट्रॅकच्या लगत असणाऱ्या गटारात एका अनोळखी सुमारे पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखतपत झाल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी पावणे आठ वाजता उघडकीस आली. त्याच्या शरीरयष्टी वरून तो नेपाळी तरुण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबतची खबर पोलीस पाटील दिपक लक्ष्मण कांबळे यांनी साखरपा पोलिसांना दिली. साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कांबळे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. तसेच सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला असता त्यांच्या खिशात चेक बुक मिळाले असून चेकबुकवर लक्ष्मी गीरी साम दिलमया गीरी असे नाव लिहिलेले होते.

टाइम्स स्पेशल

मात्र निश्चित नाव काय याचा उलगडा झाला नाही. देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनस्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्याची उंची पाच फूट पाच इंच, रंग गोरा, अंगावर जीन्स पॅन्ट व काळे फुल शर्ट घातलेले होते. जिल्ह्यात कामासाठी आलेल्या व ज्यांच्याकडे नेपाळी माणसे कामाला आहेत, त्यांना याची माहिती मिळाल्यास साखरपा पोलीस स्टेशन व देवरुख पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून पोलीस कार्यवाही सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg