loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहराच्या नूतन नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या आयुष्यात १ जानेवारीपासून सुरू होतोय नवा अध्याय

लांजा (संतोष कांबळे) - एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कधी केव्हा कसं वळण घेईल हे सांगता येत नाहीएका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेली एक युवती. कॉलेजचं शिक्षण संपताच अत्यंत प्रतिष्ठित व मातब्बर घराण्यात सुन म्हणून येते. नवरा राजकारणी त्यामुळे दोन मुलींचे संगोपन आणि मोठ्या कुटुंबाची प्रतिष्ठा संभाळत एक साधी सुशिक्षित गृहिणी म्हणून संसारात रमलेली असतानाच अचानक पक्षाकडून उमेदवारी मिळते आणि साडे चार हजाराहून अधिक नागरिक भरभरून मतांचं दान पदरात टाकतात आणि थेट लोकांमधून निवडून येत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत विराजमान होतात. साध्या मुलीची साधी गोष्टपण आपुलकी व सार्‍यांच्याच मनात स्नेहभाव वाढवणारी ही गोष्ट आहे लांजा शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सावली सुनिल उर्फ राजू कुरूप यांचीवर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या स्वतः च्या जीवनात नवीन अध्याय सुरू होत आहेत्या लांजा शहराच्या नगराध्यक्ष म्हणून १ जानेवारी रोजी पदग्रहण करत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहराच्या नगराध्यक्ष सावली सुनिल कुरूप यांचं माहेर लांजा तालुक्यातच आहे. हर्दखळे हे त्यांचं मूळ गाव. हर्दखळे येथील सुरेश इंदुलकर यांच्या सुकन्या असलेल्या प्रिती यांचं पाचवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाल्यावर त्या कुटुंबासह गावी आल्या. त्यामुळे त्यांचं माध्यमिक शिक्षण प्रतापराव माने विद्यालय भांबेड येथे झालं. त्यानंतर त्यांनी कला शाखेतून पदवीचं शिक्षण न्यू एज्युकेशन सोसायटीच्या लांजा वरिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केलं. सन २००८ मध्ये त्यांचा सुनिल उर्फ राजू कुरूप यांच्याशी विवाह झाला. आणि पूर्वाश्रमीच्या प्रिती सुरेश इंदुलकर या कुरूप घराण्याच्या सुनबाई बनून लांजा शहराच्या कायमस्वरूपी रहिवासी झाल्या. सावली कुरूप यांचा भाऊ मुंबईत इंजिनिअर आहे. आई वडील आणि एक भाऊ असे चौकोनी कुटुंब असलेल्या इंदुलकर कुटुंबाला करोना काळात मोठा धक्का बसला. करोनाच्या महामारीत त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि वडिलांचा आधार गमावला. २१ डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर त्या वडिलांच्या आठवणीने गहिवरून गेल्याचे लांजावासियांनी पाहिले. सावली व सुनिल या दाम्पत्याला दोन मुली आहेत. एक मुलगी अकरावीमध्ये आहे तर दुसरी नववीत शिक्षण घेत आहे. पती सुनिल हे राजकारणात बिझी असल्यामुळे दोन मुलींच्या शिक्षणाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिले.

टाईम्स स्पेशल

लांजा शहरातील कुरूप घराणं मोठं प्रतिष्ठित सुधाकर कुरूप हे या घराण्याचे प्रमुखखरं तर ते काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते होतेकाँगेस पक्षाचे तालुकाप्रमुख पद बरीच वर्षे त्यांनी भूषवलं मोठे बंधू काँग्रेसमध्ये त्यामुळे सुनिल उर्फ राजू कुरूप यांनी आपली राजकीय कारकीर्द काँगेस पक्षातूनच सुरू केली. आधी सरपंच मग उपसभापती नंतर लांजा शहराचे नगराध्यक्ष अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान राहिलेली आहे. आत्ता त्यांच्या सौभाग्यवती सावली कुरूप लांजे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे त्यांचा भक्कम पाठिंबा सावली यांना मिळणार आहे. पती सुनिल कुरूप राजकीय नेते आणि सावली सुशिक्षित व कुटुंबवत्सल गृहिणी. राजकारणाचा कसलाच अनुभव त्यांना नव्हता. पण त्याची कमतरता त्यांनी अजिबात भासू दिली नाही. निवडणुकीच्या प्रचारात त्या घरोघरी फिरल्या. विशेष म्हणजे प्रचाराच्या सार्‍या मोहिमेत त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला. महिला मतदारांशी आपुलकीने संपर्क साधल्यामुळे शहरभर त्यांच्याविषयी चर्चा राहिली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. विशेष म्हणजे सावली कुरूप या ज्या लांजा वरिष्ठ महाविद्यालयात शिकल्या त्या महाविद्यालयाच्या संस्थेचे म्हणजे न्यू एज्युकेशन सोसायटीचे सुनिल उर्फ राजू कुरूप उपाध्यक्ष आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg