loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. अलिमिया परकर हॉस्पिटल’तर्फे सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : प्रत्येक माणूस हा समाजाचा एक उपयुक्त घटक आहे. समाजासाठी काम करत असताना त्याला योग्य मान-सन्मान मिळायलाच हवा. मात्र, समाजाचे ऋण फेडत असताना आपल्या कुटुंबाकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही स्वतःच्या देहाचे संरक्षण आणि संवर्धन केले नाही, तर दुसरा कोणीही ते करणार नाही,” असे प्रतिपादन डॉ. अलीमिया परकर हॉस्पिटलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. सीपीआरचे प्रशिक्षण एखाद्या माणसाचा जीव वाचवू शकत, असेही त्याने स्पष्ट केले. ​परकर हॉस्पिटल आणि रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 'सीपीआर' (हृदयविकाराचा झटका आल्यानंतर करण्यात येणारा प्राथमिक उपचार) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी आमदार राजन साळवी, राजेश शेळके, पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, माजी नगरसेवक सलील डाफळे, अविनाश कदम, नितीन तळेकर, सुभाष गोताड, सलीम जमादार, डॉ. अनुराधा लेले आदी उपस्थित होते. डॉ. परकर म्हणाले, ​सतत बसून राहण्याचे धोके ​रिक्षा चालक किंवा एकाच जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याला धोकादायक आहे. तासनतास बसून राहिल्यामुळे पायांमध्ये गाठी होण्याच्या समस्या निर्माण होतात. व्यवसायाचा गाडा सांभाळताना शरीराकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते. ​आरोग्यासाठी 'या' त्रिसूत्रीचा अवलंब करा: ​निरोगी राहण्यासाठी दररोज चाला, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्या, धावपळीच्या जीवनात शरीराला विश्रांती देण्यासाठी ८ तास झोप घ्या.

टाईम्स स्पेशल

​सीपीआरचे महत्त्व पटून देते ते म्हणाले, ​हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी 'सीपीआर' तंत्राचा वापर करून रुग्णाचे प्राण कसे वाचवता येतात यासाठीची प्राथमिक माहिती जनतेशी थेट निगडित असलेल्या रिक्षा व्यवसायिकांना मिळावी यासाठी आम्ही या सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. तुमच्या या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीव वाचू शकतो. रस्ते अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रिक्षा चालक हे 'प्रथम प्रतिसादक' म्हणून काम करत असतात, त्यामुळे हे प्रशिक्षण त्यांच्यासाठी जीवनदायी ठरणार आहे,असेही त्यानी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते. त्यांना सीपीआरचे तज्ञ डॉक्टरांकडून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी परकार हॉस्पिटल तर्फे प्रथमोपचार किट वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रिक्षा चालकांनो, कुटुंबासाठी स्वतःच्या देहाची काळजी घ्या

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg