loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत धामणसे ग्रामपंचायतमध्ये विविध कार्यक्रम संपन्न

धामणसे - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत धामणसे गावामध्ये दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. अंगणवाड्यांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. अभियान काळामध्ये महिलांची आरोग्य तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी करून ज्या महिलामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 10 पेक्षा कमी आहे अशा महिलांना हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्यामार्फत फेरस सल्फेट गोळ्यांचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीतील बालकांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले अभियान काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजने मधून मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देऊन सन्मानित करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद शाळा धामणसे नंबर एक येथील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जनजागृती बाबत प्रबोधनात्मक पथनाट्याची सादरीकरण केले तसेच माध्यमिक विद्यालय धामणसे येथील विद्यार्थ्यांनी विसनमुक्तीपर पथनाट्य सादर केले. त्यानंतर आर्ट ऑफ लिविंग स्वस्त मार्फत आरोग्यासाठी योग साधना व मेडिटेशन प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सायंकाळच्या सत्रात धामणसे गावातील महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या महिलांना पैठणी साड्यांचे वाटप ग्रामपंचायतचे मार्फत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच अमर रहाटे, उपसरपंच ऋतुजा कुलकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत, माध्यमिक विद्यालय धामणसेचे अध्यक्ष मुकुंद जोशी, माजी मुख्याध्यापक तथा माजी सरपंच अविनाश जोशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील लोगडे, जोशी, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी, माजी सरपंच विलास पांचाळ, ग्रामपंचायत अधिकारी देविदास इंगळे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, उद्योजक अविनाश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, अनघा जाधव, संजय गोंबरे, समीर सांबरे, पशु वैद्यकीय अधिकारी, डॉ.वाघमारे, आरोग्य पर्यवेक्षक निवेंदकर, मुख्याध्यापक सुतार, गायकवाड, ढापरे सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका CRP, तोडणकर, देवरुखकर, बचत गट अध्यक्ष, बचत गटातील महिला माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी मोहन पवार, ग्रामरोजगार सहाय्यक मोहन लिंगायत, कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायत अधिकारी देविदास इंगळे यांनी केले व आभार प्रदर्शन सरपंच अमर रहाटे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg