loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वेत्ये गावात लोकसहभागातून पाणंद रस्त्यांचे काम कौतुकास्पद

सावंतवाडी (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत वेत्ये येथे लोकसहभागातून पाणंद रस्ते दुरुस्ती व विकासाची कामे यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहेत. गावातील शेतकरी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयातून ही कामे होत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळ्याच्या काळात शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत वेत्येने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पाणंद रस्त्यांचे काम हाती घेतले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून लोकसहभागातून रस्ते साफसफाई, मुरूम टाकणे व दुरुस्तीची कामे केली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेती कामांसाठी वाहतूक सुलभ झाली आहे. लोकसहभागातून विकास साधण्याचा आदर्श वेत्ये ग्रामपंचायतीने निर्माण केला असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरविण्याचे उत्तम उदाहरण वेत्ये गाव ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg