loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी येथील जागृत देवस्थान श्रीभगवती देवीचा यात्रोत्सव 2 जानेवारी 2026 रोजी प्रारंभ

गावखडी (वार्ताहर) - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी (भूतेवाडी) येथील जागृत देवस्थान भगवती देवीचा यात्रोत्सव शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवात निमित्त या दिवशी सकाळी देव्हारामध्ये भगवती देवीचे मुखवटे लावून देव्हारा भक्तगणांच्या दर्शनासाठी भक्तीमय वातावरणात मंडपात आणला जातो. त्याचप्रमाणे या यात्रोत्सवानिमित्त मंडळाच्यावतीने गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठिक 3 वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ, विविध खेळ आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी भूतेवाडीतील महिलामंडळातर्फे दुपारी ठिक तीन वाजता हळदीकुंकू समारंभ, भाग्यवान महिलेस देवीच्या मानाची पैठणी साडीचा मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळ मेर्वी भूतेवाडी तर्फे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री आठ वाजता क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री भगवती देवीचा गोंधळ रात्री बारा वाजता भुतेवाडीतील भाऊबंदकी तर्फे भक्तिमय वातावरणात करण्यात येणार आहे. रात्री साडेबारा वाजता हिंदी चित्रपट कांंतारा 2 दाखवण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

या यात्रोत्सवाची सांगता दुसर्‍या दिवशी सकाळी ठिक अकरा वाजेपर्यंत केली जाते. या सर्व कार्यक्रमाचा व भगवती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी येथील श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र भूते आणि उपाध्यक्ष दिपक भूते आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. या यात्रोत्सवात लागणारे पूजा साहित्य, देवीची ओटी, खेळणी, प्रसाद, विविध खाद्यपदार्थ दुकाने व्यापारी थाटतात. यात्रोत्सव निमित्त आर्थिक उलाढाल होत असते. मेर्वी भूतेवाडी येथील श्री भगवती देवी जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी असल्याने भाविकांची अलोट गर्दी दिसून येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg