loader
Breaking News
Breaking News
Foto

मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत देवडे बॉईज संघ विजयी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील श्री गोपाळकृष्ण युवा मित्रमंडळ मुर्शी, वाणीवाडी येथे घेण्यात आलेल्या ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत देवडे बॉईज संघ विजेता व गांगेश्वर कनकाडी संघ उपविजेता ठरला. तसेच राहुल 11 संघाला तृतीय पारितोषिकावर समाधान मानावे लागले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज या दोन्ही वैयक्तिक बक्षीसांचा किताब देवडे बॉईज संघाच्या अमोल कांगणे या फलंदाजाने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर जिंकला. दुसऱ्या सेमिफायनल सामन्यात त्याने गेल्यावर्षीपासुन अपराजित असणाऱ्या व स्पर्धेतील सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या राहुल इलेव्हन संघाला एकहाती नमवले. 55 धावांचा पाठलाग करताना त्याने चौकार, षटकारांच्या जोरावर वैयक्तिक 45 धावा केल्या व 4 चेंडु राखुन सहज विजय मिळवला. या स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर होता. अंतिम सामन्यातही त्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याला आकर्षक चषक, मंडळाचे टी शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15000, द्वितीय पारितोषिक 10000, तृतीय पारितोषिक 5000 व तिन्ही विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत सचिन निवळकर, चिन्मय भिंगार्डे, प्रमोद मोघे, निलेश मोघे, श्रेयश शेट्ये व सुरज शेट्ये यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाडीतील सर्व ग्रामस्थ व कमिटीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg