loader
Breaking News
Breaking News
Foto

अ.शि.देसाई टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना स्वर्गीय डॉ. एस.एस. आजगावकर ताम्रपत्र वितरण

मालवण (प्रतिनिधी) - शिक्षक हा शाळेची खरी संपत्ती असून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांनी ही संस्था निर्माण केली. त्यानंतर असंख्य व्यक्ती या संस्थेच्या देदीप्यमान इतिहासात सहभागी झाल्या. त्या साऱ्यांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे आज आपण यशस्वी माजी विद्यार्थी म्हणून उभे आहोत. विद्यार्थ्यांनी दातृत्वातून शाळेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन 'स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट विजेते डॉ. प्रसाद वायंगणकर यांनी केले. मालवण एज्युकेशन सोसायटीतर्फे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी येथील अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या 'स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट' वितरण सोहळा मंगळवारी टोपीवाला हायस्कूलच्या रंगमंचावर झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर संस्था सेक्रेटरी विजय कामत, प्राचार्य लक्ष्मण वळंजू, ऍड. अक्षय सामंत, शैलेश खांडाळेकर, चंद्रकांत सामंत, किशोर पटवर्धन, गुरुनाथ सामंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षीचा 'स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट' टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रसाद जनार्दन वायंगणकर यांना, तर मानपत्र पुरस्कार प्रशांत रवींद्रनाथ खोबरेकर आणि इरावती किशोर पटवर्धन (पूर्वाश्रमीच्या सुजाता अनंत केतकर) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. इरावती पटवर्धन यांनी प्रशालेच्या विकासासाठी १ लाख १ हजार रुपयांची देणगी यावेळी संस्थेकडे सुपुर्द केली. यावेळी मानपत्र विजेते प्रशांत खोबरेकर यांनी तुमची जी भावना योग्य प्रमाणात असते आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थित साथ दिलीत, तर कोणत्याही कामात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या शाळेचे, शिक्षकांचे, आई-वडिलांचे, गुरुजनांचे आशीर्वाद घेतलात, तर कधीही अपयश येत नाही. मी जे कार्य करेन, ते केव्हाही चांगलेच करेन हे कायम लक्षात ठेवा. चांगल्या कृतीचे फळ नेहमीच योग्यवेळी आणि योग्य पद्धतीने मिळत असते. डोंगराचा काही भाग हिरवागार करण्याची संकल्पना माझी असली, तरी मला अनेकांची हळूहळू साथ लाभत गेली. निसर्गाला सहानुभूतीची नव्हे, तर त्याला जपण्याची गरज आहे,असे सांगितले तर मानपत्र विजेत्या इरावती पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी लहान वयातच चांगले संस्कार आत्मसात केल्यास त्यांना यश मिळते, असे मानपत्र विजेत्या इरावती पटवर्धन यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी आजच्या सन्मानमूर्ती असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून शिकावे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण हे आयुष्याच्या अखेरपर्यंत सदैवच चालत राहते. शालेय शिक्षणाच्या काळात मिळालेल्या मूल्यांचा योग्य वापर करून आपण आपल्या भविष्याचे स्वप्न साकार करायचे आहे, असे संस्थाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले. यावेळी प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात सर्वांगीण नैपुण्य पारितोषिक प्राप्त मुलगे- रोहन साळुंखे, मुलगी-संस्कृती नाईक, ज्युनिअर कॉलेजचा सर्वोत्तम विद्यार्थी-अर्थ कुशे, विद्यार्थिनी-दीप्ती शिंदे, सर्वोत्तम वक्ता-रोशन साळुंखे, सर्वोत्तम खेळाडू-अनुष्का गावडे, सर्वोत्तम चित्रकार-रुद्र खानोलकर, ज्ञानज्योती मुखपृष्ठ स्पर्धा हायस्कूल गट विजेती-अनुष्का गावकर, कॉलेज गट विजेती-धनश्री सावंत, प्राथमिक शाळा सर्वोत्तम विद्यार्थी-रिषभ मयेकर, विद्यार्थिनी - आद्या आपटे, खेळाडू-रेचल बुतेलो, जय गणेश स्कूल सर्वोत्तम विद्यार्थिनी-भक्ती दामले, सर्वोत्तम कलाकार-मैथिली गावडे. सूत्रसंचालन मयुरा भिसे यांनी केले. आभार वळंजू यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg