loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मनाचा राजा’ म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व राजाभाऊ ठाकूर - श्रीवर्धन नगराध्यक्ष अतुल चौगुले

रायगड :- (नरेश पाटील) - श्रीवर्धन नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अ‍ॅड. अतुल चौगुले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांच्याबाबत गौरवोद्गार काढत त्यांना दिलखुलास, मोठ्या मनाचे व जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या विजयी मेळाव्यात ते पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. अ‍ॅड. चौगुले म्हणाले की, काॅंग्रेस पक्षातील एका कार्यकर्त्याने त्यांना यापूर्वीच राजाभाऊ ठाकूर यांच्या मनमिळावू व दिलदार स्वभावाबाबत माहिती दिली होती तसेच “राजाभाऊ ठाकूर हे खऱ्या अर्थाने ‘मनाचा राजा’ आहेत, असे मला सांगण्यात आले होते परंतु निवडणुकीपूर्वी आम्हा दोघांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती आता प्रत्यक्ष भेटीनंतर आणि त्यांना जवळून समजून घेतल्यानंतर हे पूर्णपणे सत्य असल्याची जाणीव मला झाली,” असे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजाभाऊ ठाकूर यांचे मूळ नाव राजेंद्र मधुकर ठाकूर असून ते काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहेत. जनतेवरील अपार प्रेम, आपुलकी, मदत करण्याचा स्वभाव आणि सतत लोकसंपर्कात राहण्याच्या स्वभावामुळेच राजेंद्र मधुकर ठाकूर हे आज सर्वत्र ‘राजाभाऊ ठाकूर’, म्हणजेच जनतेचा राजा म्हणून ओळखले जातात. अ‍ॅड. चौगुले यांनी पुढे सांगितले की, राजाभाऊ ठाकूर यांचे वर्तन, संवादशैली, व्यक्तिमत्त्व, जबाबदारीची जाणीव आणि समाजाशी जोडलेपण हे अत्यंत प्रेरणादायी आहे. “या सर्व गोष्टी पाहून मला अभिमान वाटतो. अशा गतिमान व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात राहणे हे माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. मी स्वतः राजाभाऊ ठाकूर यांचा चाहता झालो आहे,” असे ते म्हणाले. श्रीवर्धन नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अ‍ॅड. अतुल चौगुले यांच्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांनी सक्रिय आणि प्रभावी प्रचार केला. प्रचारादरम्यान त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राजाभाऊ ठाकूर यांनी जाहीर सभेद्वारे केलेला प्रभावी व खऱ्या अर्थाने झंझावाती प्रचार हा अ‍ॅड. अतुल चौगुले यांच्या ऐतिहासिक विजयाचा निर्णायक टप्पा ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या विजयाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली असून, राजाभाऊ ठाकूर हे या यशामागील कणा व पडद्यामागील महत्त्वाची व्यक्ती ठरल्याचेही स्पष्ट होत आहे. यावेळी अ‍ॅड. चौगुले यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे लक्ष वेधत सांगितले की, “राजाभाऊ ठाकूर यांच्यासारखे नेतृत्व म्हणजे काँग्रेस पक्षाचे अमूल्य रत्न आहे. अशा नेत्यांमुळेच पक्ष अधिक मजबूत होतो.” आपले भाषण संपवताना अ‍ॅड. अतुल चौगुले यांनी, “राजाभाऊ ठाकूर यांना मनापासून सलाम,” असे म्हणत त्यांच्या कार्याला व नेतृत्वाला मानवंदना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg