loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे जिल्हा परिषद गटात शिवसेनेसह उबाठा, भाजपचीही उमेदवारांची चाचपणी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील आणि राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघातील महत्त्वाचा मोठा जिल्हा परिषद गट गणला जाणारा दाभोळे जिल्हा परिषद गट. या गटात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सर्वच पक्षांच्या उमेदवारांची चाचपणी चालू आहे. त्यातच शिंदे शिवसेनेकडून इच्छुकांची ही बरीच गर्दी आहे. कोणाची वर्णी लागणार? याकडे या मतदारसंघातील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. देवडे ते चोरवणे असा हा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदार संघ असून यावेळी या मतदारसंघात नव्याने मेघी, कनकाडी ही दोन गावे ही समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या गोळा बेरजेचा यावेळी अंदाज चुकण्याची शक्यता आहे. तसेच युती आणि आघाड्या या जागा वाटपावरून किती टिकणार की तुटणार, यावरही या मतदारसंघाचे गणित आणि अंदाज वर्तविले जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी शिंदे शिवसेनेकडून सध्या अनेक नावे चर्चेत आहेत. तरीही ठराविक दोन ते तीन नावांची सध्या चर्चा चालू आहे. शिवसेना भाजपा युती तुटली तर भाजपा ही उमेदवारांची चाचपणी आत्तापासून करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच उबाठाकडूनही या मतदार संघात तगडं आव्हान उभं करण्याच्या तयारीत कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघात तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या चिरंजीवांना नव्यानेच या मतदारसंघात उतरवण्याच्या तयारीत उबाठाचे कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघात या बड्या नेत्यांना मानणारा मतदार व कार्यकर्ते असल्याने याचा फायदा होऊ शकतो का? याची चाचपणी सध्या उबाठाकडून करण्यात येत आहे. त्यातच भाजपाची ही युती तुटल्यास उमेदवारांची चाचपणी भाजपा करत आहे. नाही म्हटलं तरी या मतदारसंघात भाजपाचे फिक्स मतदार असून त्याचाही विचार या मतदारसंघाबाबत होणे गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

युत्या आणि आघाड्या यावरच या मतदारसंघातील येणार्‍या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील गणिते आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची गणिते कधीही बदलू शकतात. याचं कारण मागील १०/१५ वर्षाचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे निकाल बघितले की बरेच खुलासे मिळतात. या मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका त्या त्या भागातील उमेदवारांच्यावर अवलंबून असतात. या निवडणुकांना स्थानिक उमेदवार असल्याने वैयक्तिक संबंधावरतीही निवडणुकीत मतदानावर फार मोठा फरक पडतो. याचा अनुभव मागील काही निवडणुकीचा अभ्यास केल्यास व लेखाजोखा घेतल्यास समोर येतो. लोकसभा विधानसभा निवडणुकीतून असलेला मतदानाचा आकडा काही वेळेला या मतदारसंघात उलट पडल्याचे चित्र मागील निवडणुकातून दिसले आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या उमेदवार निवडी वरूनच निवडणुकीतून कोण निवडून येणार? याचं भवितव्य ठरणार आहे. येत्या काही दिवसातच या निवडणुका लागतील आणि उमेदवारांच्या चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होईल. निकाल लागेपर्यंत चर्चा चालू राहतील, कोण फुटला? कोण मिळाला? याबाबत चर्चेला उधाण येईल, मात्र ही निवडणूक सर्वच बाबतीत सोपी नसल्याचे या मतदारसंघातील कसलेल्या राजकारण्यांचे मत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg