loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न, घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरटा गेला पळून

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील साखरोली येथे दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे. घरमालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी चोरी टळली, मात्र संशयित चोरटा जंगलाच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घरमालकाला घराजवळ संशयास्पद हालचाल जाणवताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याने परिस्थिती ओळखून तत्काळ जंगलाच्या दिशेने पलायन केले. या घटनेनंतर संबंधित कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळी पाहणी केली असता पोलिसांना काही संशयास्पद साहित्य आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या ग्रामीण भागात चोरीच्या प्रयत्नांचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहावे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg