loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनवडे हायस्कूल येथे रविवारी एसएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संगमेश्वर (प्रतिनिधी) - काटवली ग्रामस्थ, माध्यमिक विद्यालय सोनवडे (सोनवडे हायस्कूल) आणि न्यू इंग्लिश स्कूल, वाशी (वाशी हायस्कूल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पासून सोनवडे हायस्कूल येथे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिरात निष्णात शिक्षकांकडून, तसेच तज्ञ मार्गदर्शकांकडून एसएससी विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यादवराव घाग प्रतिष्ठानतर्फे एसएससी परीक्षांवर आधारित प्रश्नोत्तरे-पुस्तिकाही उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आगामी एसएससी परीक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरेल. सोनवडे हायस्कूल व वाशी हायस्कूलचे विद्यार्थी/विद्यार्थिनीं या शिबिरात सहभागी असतील. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg