loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट उत्सव; ‘सौख्या इलेव्हन’ संघाचे चषकावर नाव

ठाणे : बेडेकर महाविद्यालयाच्या मैदानावर श्रीमान आर. जी. काते साहेब चषक २०२५ ही माजी विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत माजी विद्यार्थ्यांचे १३ तर माजी विद्यार्थिनींचे ४ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत ‘सौख्या इलेव्हन’ संघाने विजेतेपद पटकावले, तर ‘कुलस्वामिनी इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले’. विध्यार्थीनींच्या संघातून ‘झाशीची राणी’ आणि ‘जिजाऊ क्वीन इलेव्हन’ या संघांनी विजेते आणि उपविजेतेपद मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता माजी विद्यार्थ्यांसाठी एकत्र येण्याचा आनंदोत्सव ठरली. सुमारे ४०० माजी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. क्रिकेट सामन्यांसह विविध उपक्रमांमुळे मैदानावर उत्साही आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात क्रीडा समितीचे सदस्य, कार्यकारी समितीतील पदाधिकारी, स्वयंसेवक आणि अंपायर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच, माजी विद्यार्थी व मान्यवरांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा भव्यदिव्य कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

टाइम्स स्पेशल

माजी विद्यार्थी सेवा संस्था (नोंदणीकृत) ही पुढेही श्रीमान आर. जी. काते विद्यालय, धामणी पंचक्रोशी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg