loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली विद्यालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

खेड - पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली व आत्माराम सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. शारदा आत्माराम यादव यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून जवळपास 20 संघ उपस्थित राहिले. अतिशय सुरेख व अतितटीचे असे हे सामने आनंदाच्या वातावरणात पार पडले. सदर स्पर्धांचा उद्घाटन सोहळा श्री चिकण, आत्माराम सर फाउंडेशनचे अध्यक्ष आत्माराम यादव, प्रशालेचे प्राचार्य श्री. कांबळे, संस्था पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. दिवसभरात जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या संघाने आपल्या खो-खोच्या खेळाचे अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केले व प्रेक्षकांना आपल्या खेळाने मंत्रमुग्ध करून सोडली. या स्पर्धांमध्ये मुलींच्या गटात प्रथम क्रमांक आर्यन स्पोर्ट्स क्लब अ टीमने पटकावला त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आर्यन स्पोर्ट्स ब गटाने पटकावला तसेच तृतीय क्रमांक आंबवली विद्यालयाच्या अ गटाने व चतुर्थ क्रमांक आंबवली विद्यालयाच्या ब गटाने पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुलांच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल कसबा, द्वितीय क्रमांक राजापूर अ गट, तृतीय क्रमांक श्री स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी व चतुर्थ क्रमांक राजापूर ब गट यांनी पटकावला. विजयी संघाना प्रथम पारितोषिक 7777 रुपये रोख व सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले तसेच द्वितीय क्रमांकासाठी 5555 चषक व प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले तृतीय क्रमांक रुपये 3333 रोख व चषक आणि प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघासाठी 2222 रुपये रोख व चषक आणि प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष व आत्माराम सर फाउंडेशनचे अध्यक्ष आत्माराम यादव हे उपस्थित होते. पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचे संजय यादव त्याचबरोबर कार्यकारी मंडळाचे चेअरमन विश्वासराव कदम, कार्यकारी मंडळाचे सचिव दीपक यादव तसेच संचालक चंद्रशेखर यादव, चंद्रकांत महाडिक आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. आत्माराम सर फाउंडेशनच्यावतीने अजय आत्माराम यादव संस्थापक अध्यक्ष कोकण विकास मंच संस्थापक कोकण बाजार, अवधूत विश्वनाथ मोरे आत्माराम सर फाऊंडेशनचे सचिव त्याचबरोबर श्रीमती संगीता विश्वनाथ मोरे त्याचबरोबर अनंत कदम, सौ.ज्योती कदम, तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री कांबळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ त्याच बरोबर विविध तालुक्यातून आलेले संघ प्रशिक्षक व सामना अधिकारी प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. शिर्के, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

सदर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी विश्वस्त मंडळाचे सचिव संजय यादव यांनी विद्यार्थ्यांना आत्माराम सर फाउंडेशनचे कार्य त्याचबरोबर आत्माराम सरांचा जीवन परिचय करून दिला व त्यांच्या अंगी असलेले गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवेत असे प्रतिपादन केले. त्यानंतर आलेल्या खेळाडूंमधून काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच प्रशिक्षक व सामना अधिकारी यांनी देखील आत्माराम सर फाउंडेशन व संस्थेला धन्यवाद दिले व अशाच प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी भरवाव्यात अशी विनंती केली. त्यानंतर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे चेअरमन विश्वासरावजी कदम यांनी आत्माराम सर फाउंडेशनच्या कार्याचा सखोल आढावा घेतला व आत्माराम सरांनी शाळेसाठी तसेच गावासाठी आणि इतर सामाजिक क्षेत्रासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला तसेच पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली संस्था आत्माराम सर फाउंडेशनच्या कार्यात नेहमीच सहभागी असून अशा प्रकारचे उपक्रम घेण्यासाठी सदैव मदत करेल असे आश्वासन दिले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे, खेळाडूंचे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg