loader
Breaking News
Breaking News
Foto

मळेवाड येथील भजन स्पर्धेत विश्वकर्मा भजन मंडळ प्रथम

बांदा (प्रतिनिधी) - मळेवाड येथील गावमर्यादित भजन स्पर्धेत विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ वरची मळेवाड याने प्रथम क्रमांक पटकावला. मळेवाड हेदूलवाडी येथील श्री मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय तर मळेवाड भटवाडी येथील श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भजनप्रेमी मित्रमंडळ, मळेवाड आयोजित तसेच मळेवाड कोंडुरे गावमर्यादित श्री गजानन महाराज मंदिरात मंडळाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. एकूण सात संघानी सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भजनप्रेमी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथम क्रमांकाला रुपये ५००० द्वितीय रुपये ३०००, तृतीय रुपये २००० तसेच सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : उत्कृष्ट गायक - ओकांर मेस्री ( विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, वरची मळेवाड ) उत्कृष्ट तबला - महंत नेमण ( मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हेदूलवाडी) उत्कृष्ट पखवाज- सिद्धेश मेस्री ( विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, वरची मळेवाड) उत्कृष्ट झांजवादक- प्रशांत कुंभार ( काशिकल्याण ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कुंभारवाडी) उत्कृष्ट हार्मोनियम -नीलेश मुळीक (श्री देव म्हापसेकर प्रासादिक भजन मंडळ, वरची मळेवाड) उत्कृष्ट कोरस- (स्वरनाद काळोबा प्रासादिक भजन मंडळ, मळेवाड) उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ-(काशिकल्याण ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी) या मंडळाला देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक अमेय गावडे, पाडलोस व पुरुषोत्तम परब, तुळस यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी भजनप्रेमी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg