loader
Breaking News
Breaking News
Foto

बांगलादेशात हिंदू व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना सतत सुरू आहेत. इथं आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मैमनसिंग जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील रहिवासी ब्रिजेंद्र बिस्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ब्रिजेंद्र बिस्वास हे बांगलादेशच्या ग्रामीण निमलष्करी दलाचे सदस्य होते. काही दिवसांपूर्वीच, त्याच मैमनसिंग जिल्ह्यात, दिपू चंद्र दास नावाच्या एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार मारण्यात आले आणि नंतर झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांगलादेशी माध्यमांनुसार, सुलताना स्वेटर्स लिमिटेड कारखाना भालुका उपजिल्हातील मेहराबारी भागात आहे. कारखान्याच्या सुरक्षेसाठी वीस अन्सार सदस्य तैनात करण्यात आले होते. त्यापैकी ब्रिजेंद्र बिस्वास हे देखील होते. सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ब्रिजेंद्र बिस्वास त्यांचे सहकारी नोमान मियांसोबत बसले होते, तेव्हा नोमानने त्यांच्या बंदुकीने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी थेट ब्रिजेंद्रच्या डाव्या मांडीला लागली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लबीब गटाचे प्रभारी अन्सार सदस्य एपीसी मोहम्मद अझहर अली यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता.

टाइम्स स्पेशल

त्याने सांगितले की, सर्वजण खोलीत बसले होते. अचानक नोमानने त्याची बंदूक ब्रिजेंद्रच्या मांडीवर रोखली आणि ओरडला, "मी तुला गोळी घालेन." त्यानंतर तो ट्रिगर दाबून पळून गेला. पोलिसांनी आरोपी नोमानला अटक केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg