loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी नगराध्यक्षांचे भावी नगराध्यक्षांना पत्र

खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषदेच्या दालनात आज एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवास आला. महायुतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी पदभार स्वीकारताना माजी नगराध्यक्षांनी भावी नगराध्यक्षांसाठी लिहून ठेवलेले पत्र उघडण्यात आले आणि या घटनेने संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी, 27 डिसेंबर 2021 रोजी, पुढे कोण नगराध्यक्ष होईल हे माहीत नसतानाही भावी नगराध्यक्षांसाठी शुभेच्छा आणि मार्गदर्शनपर संदेश लिहून ठेवला होता. पदभार सोडताना त्यांनी या दालनाचे आशीर्वाद घेत हे पत्र ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवले होते. आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी पदभार स्वीकारताना वैभव खेडेकर यांनी त्यांना दालनातील ड्रॉवरच्या चाव्या सुपूर्द केल्या आणि ड्रॉवर उघडण्याची विनंती केली. ड्रॉवर उघडताच त्यामध्ये ठेवलेले पत्र दिसून आले. ते पत्र वाचताच उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणातच या पत्राची चर्चा खेड शहरात सर्वत्र सुरू झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रातील आशय वाचून दाखवताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, “आपल्या नव्याने सुरू होणाऱ्या कारकिर्दीस माझ्याकडून शुभेच्छा. नगराध्यक्ष आसन हा काटेरी मुकुट आहे, तो न्याय देण्याचे आसन आहे. या आसनाचा उपयोग शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी करावा. सत्याची बाजू परखडपणे घ्यावी, प्रसंगी कटुता आली तरी चालेल. या आसनाचा उपयोग लोककल्याणासाठी करावा. कारभारात पारदर्शकता आणि विश्वासार्हता ठेवावी. आपल्या भावी वाटचालीस आई भवानी प्रचंड यश देवो.” या संदेशाने उपस्थितांना भावूक केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी या पत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, हा संदेश आपल्या कारकिर्दीत मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या न्यायासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. माजी नगराध्यक्षांनी भावी नगराध्यक्षांसाठी लिहून ठेवलेल्या या पत्रामुळे खेड नगरपरिषदेतील आजचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा केवळ औपचारिक न राहता, परंपरा, संस्कार आणि लोकसेवेची भावना अधोरेखित करणारा ठरला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg