loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित, सुनिश्चित करण्यासाठी तालुक्यातील जनता, माटे भोजने सभागृहात एकवटली

संगमेश्वर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनां दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करून प्रत्येक शाळामध्ये विद्यार्थ्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शासनाकडून करून घेण्याचा निर्धार सर्व शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षण प्रेमी यांच्या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबांच्या मुलांना दिले जाणारे शिक्षण दर्जेदार असायला हवे. भावी पिढीच्या शिक्षणाला योग्य दिशेने चालना देण्यासाठी आज देवरूख येथील माटे भोजने सभागृहात एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा संगमेश्वर च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची रुपरेषा, विषयाचे गांभीर्य उपस्थितांना समजावून सांगितले गेले . या विषयावर पोटतिडकीने व्यक्त होणारे काही मोजके शिक्षक आपली जबाबदारी चोख पार पाडत होते. पण या लढ्याला सर्वसामान्य जनतेच्या पाठबळाची नितांत आवश्यकता होती. हे ध्यानात घेऊन आजच्या परिसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक प्रतिनिधी, सरपंच, पोलिस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते , पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उजाड करणारे शासकीय आदेश आम्ही झुगारून देणार! शिक्षक कपातीचा कडाडून विरोध करणार! दर्जेदार शिक्षणाचा आग्रह धरणार! प्रसंगी लोकप्रतिनिधींना वास्तव दर्शन घडवणार! हा संकल्प करण्यात आला. . या ठिकाणी आलेल्या शाळा व्यवस्थापन कमिटी शिक्षण तज्ञ पोलीस पाटील तसेच शिक्षण प्रेमी नागरिक यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची शाल न पांघ रता एक सुजाण नागरिक म्हणून ग्रामीण भागातील मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार आजच्या सभेत सर्व पालक आणि पदाधिकारी यांनी व्यक्त केला.राजकारण ,पक्ष धार्जिणे धोरण न घेता कोकणातील जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत त्यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून प्रयत्न करण्यासाठी संघटन स्थापन करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

टाइम्स स्पेशल

जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणा देण्यासाठी किमान काही गोष्टी मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह शासनाकडे करण्याचे निश्चित करण्यात आले . जर शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर जन संघर्ष निर्माण करून गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सनदशीर मार्गाने मिळवण्याचा मार्ग वारंवार चर्चेतून घेण्यात येईल अशा पद्धतीने कामकाज करायचे असे ठरवण्यात आले या सभेचे आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा संगमेश्वर यांनी करून समाजासाठी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे सर्वांनी समिती तालुकाध्यक्ष संदेश गावडे यांना विशेष धन्यवाद दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg