loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी सातोसे बस फेरी सातार्डा पर्यंत करावी, सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना निवेदन

सावंतवाडी - येथील सावंतवाडी बस स्थानकातून सुटणारी सावंतवाडी सातोसे ही बस फेरी सातार्डा पर्यंत करुन शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोयी दूर करा, अशी मागणी आज उबाठा शिवसेनेच्या वतीने सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ते यांच्या वतीने आगारप्रमुख निलेश गावित यांच्याजवळ करण्यात आली. लवकरच या संदर्भात कार्यवाही करू असे आश्वासन गावित यांच्याकडून देण्यात आले. पारिपत्ये यांनी आज उबाठाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश रावळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख राजू शेटकर, युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत आगारप्रमुख गावित यांची भेट घेतली. यावेळी सातार्डा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव रावळ, युवा सेनेचे योगेश गोवेकर, सामाजिक कार्यकर्ते किरण प्रभू आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत गावित यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये सावंतवाडी आगारातून दररोज दुपारी बारा वाजता सावंतवाडी ते सातार्डा असे बसफेरी सोडण्यात येते. ही बस बांद्यामार्गे सातोसे गावापर्यंत येऊन पुन्हा परत सावंतवाडीला जाते. सातोसे तसेच सातार्डा या भागातून सावंतवाडी व बांदा या ठिकाणी कॉलेज व महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही बस फायद्याची ठरते. परंतु सातोसे मार्गेच ही बस फेरी पुन्हा परत जात असल्याने सातार्डा गावातील कॉलेज महाविद्यालय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना सातोसे मध्येच उतरावे लागते. यामुळे त्यांना पुढचा प्रवास खाजगी वाहने तसेच अन्य मार्गाने करावा लागतो. याचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागतो. दुसरीकडे सातसे गावातील तलाठी कार्यालय, रेशन धान्य दुकान आदी सर्व व्यवस्था सातार्डा या ठिकाणी असल्याने तेथील ग्रामस्थांना या बसचा फायदा होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून सदरची बस ही सातोसे पर्यंत न सोडता सातार्डा पर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी पारिपत्ते यांनी निवेदनातून केली आहे. गावित यांनी सदर मागणीचा विचार करता लवकरात लवकर सदरची बस सातार्ड्यापर्यंत सोडण्यासाठी कार्यवाही हाती घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg