loader
Breaking News
Breaking News
Foto

५० रुग्णांपैकी पहिले १२ रुग्ण अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर येथे रवाना

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त “अथायु हॉस्पिटल”, कोल्हापूर यांच्या सहयोगाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि आरोग्यदुत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रुग्णांसाठी दुर्बीणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, व लेसरद्वारे व्हेरीकोज व्हेन्स यांची मोफत तपासणी व ऑपरेशन याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिराला १२३ रुग्णांनी उपस्थित राहून तपासणी केली होती. यामधून ५० रुग्ण मुतखडा व प्रोस्टेट, व्हेरीकोज व्हेन्स या आजारावरील ऑपरेशनसाठी सापडले होते. या ५० पैकी प्रथम २० रुग्णांच्या बॅचमधील रुग्णांना उदय सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात बोलवून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती दिली गेली होती. शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रथम १० रुग्णांची बॅच, त्यांच्या सोबत एक नातेवाईकसहीत “अथायु हॉस्पिटल”, कोल्हापूर येथे पाठविण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्याकरिता खास गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. या करीता अझीम चिकटे यांनी मोलाचे सहकार्य केले, सागर भिंगारे यांनी रुग्णांसोबत समन्वय ठेवून हॉस्पिटल इथे पोहचेपर्यंत व पुढील प्रक्रियेपर्यंत समन्वय ठेवले. या शिबिरात आलेल्या रुग्ण व त्यांचे कुटुंबांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण शिबिराच्या यशस्वतेसाठी अथायु हॉस्पिटल, कोल्हापूरचे डॉ. पियुष होतचदाणी, डॉ. मुल्ला मॅडम, डॉ. दिपा देशमुख, हॉस्पिटलचे पी.आर.ओ. मदन गोरे, वैभव कातकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg