loader
Breaking News
Breaking News
Foto

धामापूर जि.प. गटात भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर जिल्हा परिषद गटाची भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक सरंद येथील साठे हॉलमध्ये भाजप नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीला उत्स्फूर्त गर्दी झाल्याने या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले होते. यावेळी करजुवेचे माजी सरपंच दिनकर पेढांबकर यांच्यासह जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत यादव आणि सतीश मोरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. धामापूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन यावेळी प्रशांत यादव यांनी दिले. या गटात भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रशांत यादव, सतीश मोरे यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, जिल्हा सरचिटणीस नुपूरा मुळ्ये, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाई नलावडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शितल दिंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रशांत रानडे, तालुका कोषाध्यक्ष शैलेश धामणस्कर, तालुका उपाध्यक्ष महेश जड्यार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्नील सुर्वे, कळंबुशीचे सरपंच सचिन चव्हाण, समीर पाटणकर, सतीश पटेल, अनंत पवार, जितेंद्र चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा नाचरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्माशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेला प्रशांत यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध पदांवर निवड करण्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना प्रशांत यादव यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले. यात शालिनी पाटणकर, रुपाली ब्रिद, वैष्णवी चव्हाण, हेमांगी चव्हाण, योगिनी पेढांबकर यांचा समावेश आहे. यावेळी धामापूर जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत यादव आणि सतिश मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. यात करजुवेचे माजी सरपंच दिनकर पेढांबकर, दिव्या पेढांबकर, सानिका पेढांबकर, दर्शना पेढांबकर, रघुनाथ गुरव, वैभव मोहिते, चंद्रकांत डावल, दीपक पवार, बळवंत दरडे, सचिन डावल, रमेश गवतडे आदींचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg