loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील भेलसई येथे गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील भेलसई महाडीकवाडी येथे दारूच्या व्यसनातून आलेल्या नैराश्यामुळे ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सतिश सदाशिव महाडीक (रा. भेलसई, महाडीकवाडी, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मयताची पत्नी स्मिता सतीश महाडीक यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सतिश महाडीक यांना दारूचे व्यसन होते. तसेच ते कोणताही कामधंदा करत नव्हते. याच बेरोजगारी आणि व्यसनाधिनतेतून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १२३/२०२५ नुसार नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg