loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवलीत जंगल तोड करणारी आदिवासी महिला 80 टक्के भाजली

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी जंगलतोड करणारी आदिवासी महिला ८० टक्के भाजली आहे. चाफवली येथे सध्या सुर्वे नामक व्यक्ती जंगलतोड करत असून त्यांच्याकडे कामाला असलेली आदिवासी महिला रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी तीन वाजताच्या दरम्याने राहण्यासाठी बांधलेल्या झोपडीतच भाजली मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती उपचाराविना तडफडत राहिली. कारण त्या आदिवासी कुटुंबाला कोणीही मदतीला नव्हते. कारण हे जंगल भागात घडलं होतं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान होळीच्या मांडावर कसे तरी हे कुटुंब आले आणि बोंबाबोंब केली रडण्याचा आवाज आला म्हणून जवळच असलेल्या चाफवली पोलीस पाटील विजय चाळके यांनी त्यांचा आवाज घेतला त्यावेळी त्यांनी धावत जाऊन चौकशी केली असता घडला प्रकार कळला. मात्र ही महिला कशी भाजली हे कळू शकले नाही. पो.पा. विजय चाळके यांनी त्वरित 108 नंबरला फोन लावला त्यावेळी साखरपा व देवरुख येथे ॲम्बुलन्स नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी आमदार भैय्या सामंत यांनी दिलेल्या देवळे येथील ॲम्बुलन्ससाठी युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर यांना संपर्क साधला असता प्रसाद अपंडकऱ यांनी त्वरित ॲम्बुलन्स आणून सदर महिलेला साखरपा आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.

टाइम्स स्पेशल

यावेळी विभाग प्रमुख राजू कामेरकर, अंकुश सुर्वे, ओंकार कोलते, प्रणित बेटकर हे साखरपा येथे आले. साखरपा येथे उपचार करून सदर आदिवासी महिलेला आ.भैय्या सामंत यांनी दिलेल्या ॲम्बुलन्सने अधिक उपचारासाठी पाली येथे हलवण्यात आले. मात्र पालीतून शासकीय ॲम्बुलन्स ने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg