loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हाप्रळ–कुंभार्ली येथे नवीन विहिरीच्या कामास सुरुवात, कुंभार्ली गावातील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला

खेड - जल जीवन मिशनमधील दूषित पाणी व भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाला सहा महिन्यांनी यश. जल जीवन मिशन – हर घर नल या योजनेअंतर्गत म्हाप्रळ–कुंभार्ली (ता. मंडणगड) येथे सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठा व झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात २८ मे २०२५ रोजी ग्रामस्थ, मुंबईकर, महिला वर्ग यांनी पंचायत समिती, मंडणगड येथे जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनातून ग्रामस्थांनी नवीन विहिरीची ठाम मागणी केली होती. या आंदोलनाला भाजप नेते वैभव खेडेकर यांनी मोलाचे सहकार्य व पाठबळ दिले. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ व महिला वर्ग यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सलग सहा महिन्यांच्या संघर्षानंतर नवीन विहिरीच्या कामाचे भूमिपूजन वैभव खेडेकर यांच्या हस्ते होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशामध्ये ग्रामस्थ मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष सीताराम कलमकर, अध्यक्ष मारुती धोंडू म्हाप्रळकर, रामदास म्हाप्रळकर, वासुदेव केळसकर, लहू म्हाप्रळकर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष राकेश रामदास म्हाप्रळकर, उपाध्यक्ष सचिन सुभाष संवादकर, अशोक चिपळूणकर, सीताराम लंगे, चंद्रकांत केळसकर, नथुराम कलमकर, महेश संवादकर, गणेश चिपळूणकर आणि संपूर्ण महिला वर्ग यांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे.

टाइम्स स्पेशल

ग्रामस्थांच्या एकतेचा, महिलांच्या सहभागाचा आणि सातत्यपूर्ण लढ्याचा हा विजय असून, लवकरच गावाला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी या विहिरीचा भूमिपूजन सोहळा वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg