loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या विजयासाठी महायुती सज्ज

पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी आज नियोजित वेळापत्रकानुसार आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने दाखल केले. विविध प्रभागांतील भाजप महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रियेनुसार अर्ज सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पनवेल महापालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय (आठवले गट ) महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत पुन्हा एकदा मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. “विकास, स्थैर्य आणि विश्वास” या मुद्द्यांवर एकत्र आलेली ही महायुती पनवेलच्या राजकारणात निर्णायक ठरणार असल्याचे वातावरणातून स्पष्ट झाले. शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg