loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरमधे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा 75 वा वाढदिवस उत्साहात साजरा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : विद्यमान केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी संगमेश्वर उत्तर मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री अमायनेश्वर मंदिर, बुरंबाड येथे अभिषेक व पूजा करून राणे साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, माखजन येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. माखजन पंचक्रोशीतील निराधार व विधवा महिलांना साडी वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष विनोद मस्के, तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, प्रशांत रानडे, पंचायत समिती सदस्य महेश जड्यार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष भाई नलावडे, चंद्रकांत जाधव, गोमाता संरक्षण समितीचे जिल्हा संयोजक अविनाश गुरव, महिला तालुकाध्यक्ष शितल दिंडे, कडवईचे माजी उपसरपंच संतोष जाधव, भास्कर मांडरकर, पाचांबे सरपंच संदेश घाडगे, संजय भायजे, तांबेडीचे माजी सरपंच राजू ब्रीद, गणेश साठे, अतिश चव्हाण, रोशन पाष्टे, शांताराम सुर्वे, प्रथमेश शिंदे, वैष्णवी चव्हाण, ऊर्मिला कातकर, प्रथमेश कडवईकर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संगमेश्वर उत्तर मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg