लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमधील २४ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी मतदान तर बुधवार दि. २९ एप्रिल रोजी निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लांजा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या थेट सरपंच जागेसहित एकूण २३ ग्रामपंचायती सदस्य अशा एकूण २४ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लांजा तालुक्यात अशाप्रकारे एकूण १३ ग्रामपंचायती मधील २४ पदे रिक्त आहेत. यामध्ये एका थेट सरपंच पदासह उर्वरित २३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. पोटनिवडणूक होणाऱ्या तेरा ग्रामपंचायतींमध्ये भडे, कुरचुंब, वाघ्रट, वेरळ, बेनीबुद्रुक, शिरवली, आगवे, खावडी, कोचरी, कोट, पुनस, कोर्ले, वेरवली खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या पोटनिवडणूकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत मंगळवार दि. ७ एप्रिल ते मंगळवार दि. १४ एप्रिलपर्यंत असून इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आपली नामनिर्देशनपत्रे सादर करायची आहेत. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची (उमेदवारी अर्ज) छाननी बुधवार दि. १५ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ही शुक्रवार दि. १७ एप्रिल आहे. या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. याचदिवशी म्हणजे १७ एप्रिल रोजी निवडणूक चिन्ह देणे तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मंगळवारी २८ एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवार दि. २९ एप्रिल रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.




























1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.