loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहर मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता संमेलन उत्साहात पार

भारतीय जनता पार्टी शहर मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता संमेलन पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले. संमेलनाचे संयोजक राजन पटवर्धन, प्रसाद बाष्ट्ये यांनी प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शपथ घेऊन करण्यात आली. “प्रथम राष्ट्र व पक्ष, मग स्वतः” या विचाराला अनुसरून कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संमेलनात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः नगरपालिका स्तरावरील कामे, प्रभागांमधील समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याबाबतही मार्गदर्शन व चर्चा झाली.

टाइम्स स्पेशल

या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव मांडत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक सहा मधील विशाका भिडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केले. कार्यकर्ता कसा असावा आणि त्यांनी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शहराध्यक्ष दादा ढेकणे संयोजक राजन पटवर्धन, प्रसाद बाष्ट्ये, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी सरचिटणीस निलेश आखाडे, संदीप सुर्वे, विशाका भिडे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg