संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - आजाराला कंटाळून एका ५१ वर्षीय महिलेने नदीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे घडली आहे. सुंगधा बाळ खापरे (वय ५१, रा. कुरधुंडा) असे मृत महिलेचे नाव असून, कोळंबे बावनदी घाटीच्या पर्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, सुंगधा खापरे या गेल्या काही काळापासून मुळव्याध आणि तीव्र कंबरदुखीच्या आजाराने त्रस्त होत्या. या सततच्या शारीरिक व्याधीमुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. शुक्रवारी दुपारी १:३० वाजल्यापासून त्या घरातून बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधमोहीम राबवली असता, शनिवारी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास कोळंबे बावनदी घाटीच्या पर्यातील पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचा मुलगा अनिल बाळ खापरे यांनी दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची आमृ. रजि. नं. १५/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास मसपोफौ व्ही. एस. तांबडे यांनी केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एस. जाधव करीत आहेत. या घटनेचा आजारपणातून घेतलेल्या या टोकाच्या पावलामुळे कुरधुंडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






















































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)






















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.