loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘कृष्ण वेणूनाद’ या भव्य बासरी मैफिलीचे आयोजन

पनवेल - माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘कृष्ण वेणूनाद’ या भव्य आणि आगळ्या - वेगळ्या बासरी मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक विशेष पर्वणी ठरणार असून, या कार्यक्रमात सुरांच्या माध्यमातून भक्ती, भाव आणि नाद यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्येष्ठ बासरीवादक एकनाथ ठाकूर गुरुकुल निर्मित या कार्यक्रमात ५० हून अधिक बासरीवादकांची अनोखी स्वरयात्रा सादर होणार आहे. ‘कृष्ण वेणूनाद’ या संकल्पनेतून भगवान श्रीकृष्णाच्या बासरीच्या माधुर्याची अनुभूती देणारी सुरेल मैफल सादर केली जाणार आहे. रंगरचना कला मंच, पनवेल यांच्या वतीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात इंडियन आयडल फेम गायिका प्राजक्ता गावंड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन विवेक ठाकूर यांनी केले असून, निवेदन विजय पवार करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, पनवेल व परिसरातील सर्व संगीतप्रेमींनी या अनोख्या बासरी मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg