loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी वक्ते प्रसाद कुलकर्णी यांचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात

खेड -(प्रतिनिधी) - गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी रोटरी स्कूलमध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कवी, गीतकार, निवेदक, प्रभावी वक्ते प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाप्रसंगी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू व पुस्तकरुपी देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ व पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सकारात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि आत्मचिंतनाचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यावश्यक आहे. कठीण परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची जिद्द आणि आयुष्य जगण्याची ओढ प्रत्येकामध्ये असली पाहिजे. योग्य विचारसरणीमुळेच व्यक्तीला योग्य निर्णय घेता येतात आणि जीवनाची दिशा ठरते. तसेच, आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव हे व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पावलोपावली मिळणारे आशीर्वाद आणि संस्कारही जीवनाच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून आपल्या आयुष्याचा योग्य अंदाज घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, त्यांना भविष्यासाठी नवी दिशा मिळण्यास प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रसाद कुलकर्णी यांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती करंबेळकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg