loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार नारायण राणे यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कणकवली (प्रतिनिधी) - खासदार नारायण राणे यांनी राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना नेहमी सत्ताधारी पक्षाला कैचीत पकडण्याचे काम केले. नारायण राणे एवढा अभ्यास करतील याबाबत त्यावेळी कोणालाही विश्वास नव्हता. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये जसा नाईट वॉचमन म्हणून आलेला फलंदाज जोरदार फलंदाजी करून जातो त्याप्रमाणे खासदार नारायण राणे यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली आहे. असे गौरोदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बोलताना केले. कणकवली येथे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, माझ्या जीवनात नारायण राणे यांचे राजकीय जीवन जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांचे माझ्याशी मैत्रीचे व कौटुंबिक संबंध आहेत. अनेक संघर्षावर मात करून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे नारायण राणे होय. सुस्पष्ट विचार, परखड नेतृत्व, प्रशासकीय कौशल्य, विषयांचा सखोल अभ्यास व उत्तम मांडणी आणि जे मांडायचे ते आक्रमकपणे मांडायचे अशा गुणांमुळे राणे यांनी राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मात्र महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासात सर्वात प्रभावी व आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून नारायण राणे यांची नोंद राहिल. प्रभावी आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व, विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून नेहमी सत्ताधारी पक्षाला कैचीत पकडण्याचे काम केले.

टाईम्स स्पेशल

राणे यांनी आपल्या मुद्द्याशी कधीही तडजोड न करता अत्यंत आक्रमकपणे मुद्दे मांडले. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली असून आजच्या तरुणांनी नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकली पाहिजेत. शिवसेना सोडताना मी त्यांना पक्ष सोडू नये म्हणून विनंत्या केल्या होत्या. त्या काळात मी नेहमी त्यांच्या सोबत राहिलो. लहान भावाप्रमाणे त्यांनी आमच्यावर प्रेम केले. राणे यांच्या या संघर्षमय जीवनात त्यांच्या पत्नी नीलमताई यांची महत्वपूर्ण साथ लाभली. राणे यांना दीर्घायुष्य लाभून त्यांचा शंभरावा वाढदिवसही असाच साजरा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही ना. गडकरी म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg