रत्नागिरी नगर परिषदेच्या भाजपा शिवसेना महायुतीच्या नगरसेविका बारामती येथे अभ्यास दौर्यावर गेलेल्या असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सदिच्छा भेट पार पडली. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तसेच महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत रत्नागिरी शहरातील विविध विकासकामे, महिला सक्षमीकरण तसेच स्थानिक प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नगरसेविकांनी आपल्या भागातील अडचणी व विकासाच्या गरजा याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासमोर मांडणी केली.
चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वर्षाताई ढेकणे यांच्या समन्वयातून ही भेट यशस्वीपणे पार पडली. यावेळी उपस्थित नगरसेविकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका वर्षा ढेकणे, स्मितल पावसकर, प्रीती सुर्वे, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, सायली पाटील, श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, आफरीन होडेकर, मेधा कुलकर्णी, पुजा पवार, जागृती पिलणकर, निवेदिता कळंबटे, रुक्सार खान, नाहिदा सोलकर आदी उपस्थित होत्या. ही भेट रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यातही अशा समन्वयातून विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या भेटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या 'नारीशक्ती वंदन' अभियानांतर्गत महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यावर विशेष भर देण्यात आला. "नारीशक्ती वंदन" कायद्यामुळे महिलांना मिळालेले राजकीय आरक्षण आणि त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला प्रतिनिधींचे वाढलेले महत्त्व यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीतील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शासनाच्या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'नारीशक्ती वंदन' हा विचार केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




















































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)






















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.