loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत काँग्रेसचे 'संघटन सृजन अभियान', जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित 'संघटन सृजन अभियान' अंतर्गत रविवारी, १२ एप्रिल रोजी रत्नागिरीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. रत्नागिरी येथील 'काँग्रेस भवन' मध्ये दुपारी १२ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली असून, यावेळी विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीदेखील जाहीर केल्या जाणार आहेत. ​या बैठकीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव दिनेश अब्रार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे निरीक्षक हनुमंत पवार, आदित्य पाटील आणि ऍड. श्रद्धा ठाकूर हे उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सभेसाठी दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, ​सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सदस्य, ओबीसी सेल, काँग्रेस सेवा दल, युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, उत्तर व दक्षिण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

​संघटन मजबुतीकरणासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, बैठकीदरम्यान जिल्हा काँग्रेसमधील विविध सेलसह युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसमधील रिक्त पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. ​रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्षांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg