loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवलीत आई काळेश्वरी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जिर्णोद्धार सोहळा

दापोली (प्रतिनिधी) - कोकणातील हिरव्यागार डोंगररांगा, निसर्गरम्य दर्‍या आणि शांत वातावरणाच्या कुशीत वसलेले दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक हे गाव लवकरच भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाच्या रंगांनी उजळून निघणार आहे. ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २२ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण कोकणासह राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे. आंबवली सांस्कृतिक सेवा मंडळ (रजि.) तसेच समस्त ग्रामस्थ (ग्रामीण व मुंबई मंडळ) यांच्या संयुक्त पुढाकारातून साकारलेला हा सोहळा सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि परंपरेच्या जतनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. हे मंदिर आंबवलीच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे भव्य प्रतीक म्हणून उभे राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक धार्मिक विधींनी होणार आहे. सकाळी ११ वाजता मंदिर उद्घाटनाचा मुख्य सोहळा संपन्न होईल. त्यानंतर देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व भजन संध्या रंगणार आहे. दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी, सायंकाळी महाआरतीनंतर रात्री ‘बुवा-जहांगीर (आतगाव)’ यांचा भजनाचा सामना रंगणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात काकड आरती, मान्यवरांचा सत्कार आणि महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रात्री ‘अस्तित्व महाराष्ट्राचं’ प्रस्तुत ‘रामायण’ हे भव्य महानाट्य सादर होणार असून सोहळ्याची सांगता दिमाखात होणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी दुपारी व रात्री महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्यासाठी राज्याचे राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg