loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराला उर्त्स्फूत प्रतिसाद

रत्नागिरी : नागरिकांचे रस्ते आणि पाणी कोणी आडवू शकत नाही. तो त्यांच्या मुलभुत अधिकार आहे. त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. वारंवार रस्ते आडविण्याच्या तक्रारी येत असल्याने गरज भासल्यास ग्रामसभा लावा, परंतु जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पायवाटा, पाणद रस्ते, पारंपरिक रस्ते किती आहेत, त्याचा सर्व्हे करावा. त्याची २३ नंबरवर नोंद करून त्यांचा विकास करा, म्हणजे भविष्यात हे प्रश्न पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सामंत यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबाराला जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, अप्पल जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रा, उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषद सभापती, शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी, बाबू म्हाप, तसेच सर्व खात्याचे खाते प्रमुख आणि मोठ्या संख्येने नागरिक तक्रारी घेऊन आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरवातीलाच गुंतवणुकीचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधिची फसवणुक केलेल्या आरजू कंपनीतील गुंतवणूकदार मोठ्या आशेने आले होते. मंत्री सामंत यांनी त्यांना निराश केले नाही. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत विचारना केली. तेव्हा ही बाब आता न्याय प्रविष्ठ आहे. न्यायालयात हा विषय गेला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून जाधव म्हणून अन्य एक अजून फरार आहे. लोकांची झोप उडवून हे आरोपी बिनधास्त रहातात हे चालणार नाही. जामीन झालेल्या तिघांचाही जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करा आणि फरारी असलेल्या आरोपीच्या कुटुंबाची चौकशी करा, म्हणजे तो कुठे आहे हे समजेल. कंपनीच्या मालमत्तेचे जप्तीची कारवाई झाली आहे. आता न्यायालयाच्या परवानगीने त्याचा लिलाव करण्यात येणार आहे, असे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. महिन्याभरात चौथा आरोपी अटक झाला पाहिजे, असे सामंत यांनी सागितले.

टाईम्स स्पेशल

या जनता दरबारामध्ये पाणी बंद केले, रस्ता आडवल्याच्या अनेक तक्रारी आल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. नागरिकांना यातून दिलासा देणारा मोठा निर्णय सामंत यांनी यावेळी घेतला. जिल्हा परिषदेला सूचना केल्या की, जिल्ह्यातील पाणंद रस्ते, पाय वाटा, पारंपरिक रस्त्याचा येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सर्व्हे करा. त्यासाठी ग्रामसभा लावाव्या लागल्या तरी चालेल. परंतु या पायवाटा, पाणंद रस्ते, पारंपरिक रस्ते २३ नंबरवर नोंद करून घ्या आणि त्यांचा प्रशासनाकडुन विकास करा. यामुळे गावा-गावातील हे वाद कायमचे मिटतील आणि असा निर्णय घेणारी रत्नागिरी हा राज्यातील पहिली जिल्हा असेल, असे सामंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg