राजापूर (प्रतिनिधी) : एन आर प्रतिष्ठान आणि रविदादा सहयोगी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “अमृत ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा” मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत प्रमुख उपस्थिती म्हणून लाभली. या विशेष सोहळ्यात तालुक्यातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या या ज्येष्ठ व्यक्तींच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या अनुभवांचा सन्मान करणे हीच खरी समाजसेवा असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच नव्या पिढीला दिशा मिळते,” असे आयोजकांनी सांगितले.
आमदार किरण सामंत यांनी आपल्या मनोगतात, "नारायण राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे ज्येष्ठांचा सन्मान करणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे केले पाहिजे,” असे सांगत आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एन आर प्रतिष्ठान आणि रविदादा सहयोगी मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, रवींद्र नागरेकर राजगुरू भाई गोसावी, सभापती नंदनी कदम, दीपक नागले, प्रकाश मांडवकर, ॲड यशवंत कावचकर, ॲड.शशिकांत सुतार, शुभांगी डबरे, प्रकाश कुवळेकर, सिद्धांनी मोरे, कोमल नवाळे, सोनाली ठुकरूळ, जानवी गावकर, आबा आडीवडेकर, प्रतीक मटकर, जितेंद्र खामकर, प्रसाद मोहरकर, राजू गुरव, उमेश पराडकर, पंढरी मयेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.




















































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)






















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.