loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री साईबाबा वास्तव्य धाम पंचम देवस्थान भवानी चौक येथे साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सावंतवाडी : श्री साईबाबा वास्तव्य धाम पंचम देवस्थान भवानी चौक येथे साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी श्री साईंची पूजा, अभिषेक व आरती संपन्न झाली‌‌.‌ दुपारी महाप्रसाद देण्यात आला‌. सायंकाळी ओंकार महापुरुष भजन मंडळ, माजगाव यांचे सुश्राव्य भजन पार पडले. तर रात्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा कर्मप्रकोप नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. रात्री समाजात कार्यरत विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यात बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा नॅशनल लेव्हल विजेती साक्षी रामदूरकर, कवयित्री नेहा कदम, सामाजिक कार्यकर्त्या समिरा खलिल, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूरचे आबा कलिंगण यासह नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कट्टर शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते दत्ता घाटकर, साईबाबा मंडळाचे जावेद शेख, सुनिल नेवगी, दानिश शेख, वाय.पी.नाईक, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, सुरेश काळे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg